Sunday, July 22, 2012

माझे धुळे विषयी थोडेसे....

नमस्कार मित्रानो...

शिक्षणाच्या संधी मिळाल्याने आपल्या शहरातील अनेक मित्र मंडळी देशभरातील विविध शहरात आणि जगभरात निरनिराळ्या देशात स्थायिक झाली आहे. गाव सुटले तरी प्रत्येकाच्या मनात असलेली गावाची ओढ कमी झालेली नसते. प्रत्येकाला आपल्या गावात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता असतेच ना... इंटरनेट च्या माध्यमातून आपल्या गावातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो.  कालानुरूप आपल्या गावात होणारे बदल, घटना यांच्या वाचनाने प्रत्येकालाच आनंद मिळतो.


आपल्या या दूरदेशी गेलेल्या मित्रांना, आपल्या शहरातल्या घडामोडींची माहिती द्यावी... छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या बातम्या त्यांच्या सोबत शेअर कराव्या म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. 


बघू या जमतोय का? यात यश मिळाले तर ते आपल्या सगळ्यांचेच असेल हे नक्की आपण सारे जण या वेबसाईट ला भेट देवून प्रोत्साहन द्याल ही अपेक्षा... धन्यवाद 

No comments:

Post a Comment