| उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेत येथील आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील वेदिया सीताराम रघुवंशी याने सुवर्णपदक मिळविले. महाविद्यालयाचे तब्बल 28 विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आले. शाखानिहाय निकाल व यशस्वी विद्यार्थी असे (कंसात टक्के) : कॉम्प्युटर इंजिनिअरिंग - अंतिम वर्ष - संपत जैमीन (74.93), विप्रा तनेजा (74.80), तृतीय वर्ष - राहुल चौधरी (75.80, विद्यापीठात प्रथम), पलक अग्रवाल (75.26 विद्यापीठात द्वितीय), मधुरिका पंडित (72.20, विद्यापीठात सहावी), द्वितीय वर्ष- श्वेता जैन (71.13 विद्यापीठात नववी), स्मिता जैन (70.26 विद्यापीठात दहावी). माहिती तंत्रज्ञान शाखा : अंतिम वर्ष - कुणाल टाक (78.53, विद्यापीठात दुसरा), पायल अग्रवाल (75.53 विद्यापीठात आठवी), अपूर्वा खत्री (73.26), तृतीय वर्ष (90) - जैमिनीकुमार पटेल (73.86 विद्यापीठात दुसरा), शोभा कांड (66.23) व मीनल चौधरी (66.06), द्वितीय वर्ष (80) - अक्षय पोपली (68.13, विद्यापीठात तृतीय), रुदल गावंडे (65.06 विद्यापीठात सातवी), दीपक पाटील (64.20) व कपिल चौधरी (64.20, दोन्ही विद्यापीठात आठवे). इलेक्ट्रॉनिक्स अँँड टेलिकम्युनिकेशन : अंतिम वर्ष - वेदिका रघुवंशी (81.54, विद्यापीठात प्रथम, सुवर्णपदक), शीतल पाटील (76.87 विद्यापीठात सातवी), सतीश वनारे (76). तृतीय वर्ष (87.41), हर्षल बारी (77.80, विद्यापीठात प्रथम), शेफाली कुकरेजा (76.87, विद्यापीठात द्वितीय), प्रियंका पाटील (76.20 विद्यापीठात तृतीय), कुमार खंडागळे (75.40 विद्यापीठात पाचवा), द्वितीय वर्ष (93.83) - पूजा कुकरेजा (72.87 विद्यापीठात आठवी), मुकुंद पाटील (66.34), रुचिता गुजराथी (66). मेकॅनिकल इंजिनिअरिंग : अंतिम वर्ष - ब्रजेश पाठक (74), मिरव पटेल (73.93), पराग चौधरी (72.86). तृतीय वर्ष (89.06) - पराग पाटील (80.06 विद्यापीठात प्रथम), धीरज पाटील (78.33 विद्यापीठात तृतीय), जगदीश परमार (73.13 विद्यापीठात दहावा), द्वितीय वर्ष (69.50), अतीब शेख (78.93, विद्यापीठात प्रथम), दीपक भावसार (78.66 विद्यापीठात द्वितीय), समीर शेख (74.33 विद्यापीठात चौथा), तुषार गुजराथी (73, विद्यापीठात पाचवा), कौशल जैन (61.93 विद्यापीठात नववा). स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाचा निकाल 72 टक्के तर प्रथम वर्षाचा निकाल 66 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. नितीन पाटील, प्रा. नीलेश साळुंके, प्रा. एस.बी. शर्मा, जनसंपर्क अधिकारी व रजिस्ट्रार प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. |
Sunday, July 22, 2012
शिरपूरचे 28 विद्यार्थी विद्यापीठात चमकले
भ्रूणहत्येविरोधात उद्या चेतना रॅली!
पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा, वाढती व्यसनाधीनता आणि स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात सर्वसामान्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी सोमवारी (दि. 23) शहरातून चेतना रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी पत्रकार परिषदेत केले.
रॅलीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, क्लब सहभागी होणार आहेत. रॅलीस सकाळी नऊ वाजता मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होईल. महात्मा गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली क्रमांक सहा, जमनालाल बजाज रोड मार्गे रॅली काढण्यात येईल. रॅलीचा जैनस्थानकात समारोप होईल. रॅलीदरम्यान विविध जाती, धर्माचे धर्मगुरू मार्गदर्शन करतील. रॅलीद्वारे प्लास्टिक वापरामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान, त्यापासून निर्माण होणारे धोके आदींसह समाजातील वाढते व्यसनाचे प्रमाण, स्त्री भ्रूणहत्या आदी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. धुळे शहर प्रदूषणमुक्त करणे हा रॅलीचा मुख्य उद्देश आहे. पर्यावरणात पशू-पक्षी, प्राण्यांचे अस्तित्व कायम राहिले तरच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहील. सण, उत्सवात सजावट करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षांची तोड होते. हे सर्व थांबले पाहिजे. त्यासाठी वैचारिक क्रांतीची गरज असून, नागरिकांमध्ये कर्तव्याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. रॅलीतून हीच जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रॅलीत विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. नागरिकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन कमलमुनी कमलेश यांनी केली. या वेळी नगरसेवक राजेंद्र कटारिया, युवराज करनकाळ, विनोद मोराणकर, नितीन बंग आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, चेतना रॅलीची तयारी पूर्ण करण्यात आली असून रॅलीची नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी शहरात प्रचार अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
माझे धुळे विषयी थोडेसे....
नमस्कार मित्रानो...
शिक्षणाच्या संधी मिळाल्याने आपल्या शहरातील अनेक मित्र मंडळी देशभरातील विविध शहरात आणि जगभरात निरनिराळ्या देशात स्थायिक झाली आहे. गाव सुटले तरी प्रत्येकाच्या मनात असलेली गावाची ओढ कमी झालेली नसते. प्रत्येकाला आपल्या गावात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता असतेच ना... इंटरनेट च्या माध्यमातून आपल्या गावातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. कालानुरूप आपल्या गावात होणारे बदल, घटना यांच्या वाचनाने प्रत्येकालाच आनंद मिळतो.
आपल्या या दूरदेशी गेलेल्या मित्रांना, आपल्या शहरातल्या घडामोडींची माहिती द्यावी... छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या बातम्या त्यांच्या सोबत शेअर कराव्या म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे.
बघू या जमतोय का? यात यश मिळाले तर ते आपल्या सगळ्यांचेच असेल हे नक्की आपण सारे जण या वेबसाईट ला भेट देवून प्रोत्साहन द्याल ही अपेक्षा... धन्यवाद
शिक्षणाच्या संधी मिळाल्याने आपल्या शहरातील अनेक मित्र मंडळी देशभरातील विविध शहरात आणि जगभरात निरनिराळ्या देशात स्थायिक झाली आहे. गाव सुटले तरी प्रत्येकाच्या मनात असलेली गावाची ओढ कमी झालेली नसते. प्रत्येकाला आपल्या गावात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता असतेच ना... इंटरनेट च्या माध्यमातून आपल्या गावातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. कालानुरूप आपल्या गावात होणारे बदल, घटना यांच्या वाचनाने प्रत्येकालाच आनंद मिळतो.
आपल्या या दूरदेशी गेलेल्या मित्रांना, आपल्या शहरातल्या घडामोडींची माहिती द्यावी... छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या बातम्या त्यांच्या सोबत शेअर कराव्या म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे.
बघू या जमतोय का? यात यश मिळाले तर ते आपल्या सगळ्यांचेच असेल हे नक्की आपण सारे जण या वेबसाईट ला भेट देवून प्रोत्साहन द्याल ही अपेक्षा... धन्यवाद
Subscribe to:
Posts (Atom)